VIDEO : ज्ञानेश्वर माऊली, तुकारामाच्या जयघोषाने दुमदुमली घोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 15:25 IST2017-01-21T11:09:32+5:302017-01-21T15:25:59+5:30
ऑनलाइन लोकमत घोटी (नाशिक), दि. २१ - संतश्रेष्ठ श्री.निवृत्ती महाराज यांच्या यात्रोत्सवासाठी त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी नाशिक जिल्ह्यालगतच्या अनेक दिंड्या ...
VIDEO : ज्ञानेश्वर माऊली, तुकारामाच्या जयघोषाने दुमदुमली घोटी
ऑनलाइन लोकमत
घोटी (नाशिक), दि. २१ - संतश्रेष्ठ श्री.निवृत्ती महाराज यांच्या यात्रोत्सवासाठी त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी नाशिक जिल्ह्यालगतच्या अनेक दिंड्या आज घोटी शहरातून जात असल्याने घोटी शहर ज्ञानेश्वर माउली तुकाराम च्या जयघोषाने दुमदुमून गेले आहे.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा सोमवारी यात्रोत्सव असल्याने त्र्यंबक भेटीसाठी अनेक दिंड्या यात्रेच्या पूर्वी जातात.नाशिक जिल्ह्यालगत असणाऱ्या ठाणे,अहमदनगर या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दिंडीसोहळ्याचे आयोजन करीत यात्रेच्या पूर्वी त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल होतात.दरम्यान ठाणे जिल्ह्यातून तसेच कोकणातून येणाऱ्या अनेक दिंड्या घोटी शहरात मुक्कामी राहतात आणि सकाळी संतांचा जयघोष करीत रवाना होतात.
यामुळे गेली दोन दिवसांपासून घोटी शहर ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या जयघोषाने दुमदुमत असल्याने घोटी शहरात भक्तिमय वातावरण अनुभवण्यास मिळत आहे.
https://www.dailymotion.com/video/x844os4