VIDEO- 'व्हॅलेंटाइन वीक'ची धूम

By Admin | Updated: February 12, 2017 20:09 IST2017-02-12T20:09:50+5:302017-02-12T20:09:50+5:30

ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 12 - दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं.....तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम ...

VIDEO - 'Dhoom of Valentine Week' | VIDEO- 'व्हॅलेंटाइन वीक'ची धूम

VIDEO- 'व्हॅलेंटाइन वीक'ची धूम

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 12 - दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं.....तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येते. तारुण्य आणि प्रेम या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे. सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू असून, प्रेमाचा फिव्हर युवकांच्या सर चढ के बोलत आहे. व्हॅलेंटाईन डे अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना, शहरातील तरुणाई हा दिवस साजरा करण्यासाठी गत आठवडाभरापासून तयारी करीत आहे.

आपल्या प्रेयसी-प्रियकराला प्रेमाची भेट म्हणून देण्यासाठी तरुण-तरुणींचे घोळके गिफ्ट आर्टिकल्सच्या दुकानांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. या निमित्ताने शहरातील बाजारपेठही विविध वस्तूंनी सजली आहे. शुभेच्छा पत्रे, टेडी बिअर, चॉकलेट्स, विविध भेट वस्तू तरुणाईला आकर्षित करीत आहेत.

७ फेब्रुवारीला रोझ डेपासून सुरू झालेला हा आठवडा प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, किस डे, हग डे असा प्रवास करीत १४ फेब्रुवारीला असलेल्या व्हॅलेंटाइन डेला संपणार आहे. हा व्हॅलेंटाइन डे कसा अविस्मरणीय राहील, यासाठी प्रेमीयुगुल आतापासूनच तयारीला लागल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

https://www.dailymotion.com/video/x844r01

Web Title: VIDEO - 'Dhoom of Valentine Week'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.