शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: देवेंद्र फडणवीसांनी पुरवला ‘बर्थडे गर्ल’चा हट्ट; चिमुकलीने दिले गुलाबजाम खाण्याचे निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 08:55 IST

गुरुवारी दापोलीचे भाजप उपाध्यक्ष केदार साठे यांच्या चार वर्षीय मुलीचा वाढदिवस होता. पक्षाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी व्हिडिओ कॉलवरुन चिमुकल्या प्रचितीला शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरी: स्थानिक पातळीवर पक्ष मजबुत करण्यासाठी राजकीय पक्ष विविध ठिकाणी बैठका, सभांचे आयोजन करत असतात. अशावेळी फक्त राजकीय विषयांवरच चर्चा होत असते. पण, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका बैठकीत त्यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. दापोलीत आयोजित भाजपच्या बैठकीत फडणवीसांनी एका चिमुकलीशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. याचा एक व्हिडीओही पुढे आला आहे. 

फडणवीसांनी पुरवला चिमुकलीचा हट्टसध्या कोकण विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये भाजपच्या आढावा बैठकी होत आहेत. यावेळी दापोलीचे उपाध्यक्ष केदार साठे सुद्धा या बैठकीला आले होते. पण, काल त्यांची चार वर्षांची मुलगी प्रचितीचा वाढदिवस होता. तिने आपल्या बाबांना वाढदिवशी बैठकीला जाऊ जाऊ नका, असा हट्ट केला.

पाहा व्हिडिओ:

पक्षाची बैठक महत्वाची असल्याने साठेंना उपस्थित राहाणे गरजेचे होते. त्यामुळे साठेंनी आपल्या मुलीची समजूत काढली. पण, प्रचितीने वेगळाच हट्ट धरला. 'देवेंद्र फडणवीस काका मला शुभेच्छा देणार असतील, तरच मी तुम्हाला बैठकीला जाऊ देईन', असा हट्ट तिने धरला. मुलीच्या हट्टासमोर बाप काय करणार. अखेर बैठक संपल्यानंतर केदार साठेंनी सगळा किस्सा देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर टाकला आणि फडणवीसांनीही प्रचितीला व्हिडीओ कॉलवर शुभेच्छा दिल्या.

गुलाबजाम खाण्याचं निमंत्रणयावेळी फडणवीस आणि चिमुकल्या प्रचितीचे संभाषण पाहून कार्यकर्तेही कौतुक करु लागले. यावेळी फडणवीसांनी प्रचितीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर, प्रचितीने त्यांना घरी गुलाबजाम खायला येण्याचे आमंत्रण दिले. या गोंडस संभाषणाचा व्हिडीओ भाजप महाराष्ट्रच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा