Video - पाण्यासाठी मांडला गुप्तेश्वर महाराजांच्या चरणी घट

By Admin | Updated: July 6, 2017 14:51 IST2017-07-06T14:48:56+5:302017-07-06T14:51:36+5:30

ऑनलाइन लोकमत सिरसोली, दि. 6 -  परिसरातील अनेक शेतक-यांनी पेरणी केली असून, गेल्या २५ दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. ...

Video - Declaration of the feet of Mandla Gupteeshwar Maharaj for water | Video - पाण्यासाठी मांडला गुप्तेश्वर महाराजांच्या चरणी घट

Video - पाण्यासाठी मांडला गुप्तेश्वर महाराजांच्या चरणी घट

ऑनलाइन लोकमत
सिरसोली, दि. 6 -  परिसरातील अनेक शेतक-यांनी पेरणी केली असून, गेल्या २५ दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे शेतक-यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे आहे. पाऊस येण्यासाठी गावातील शेतक-यांनी ग्रामदैवत असलेले श्री गुप्तेश्वर महाराज यांच्या मंदिरामध्ये घट स्थापन करण्यात आला. 
सिरसोली परिसरात बहुतांश शेतकºयांनी पेरणी केली आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. आधीच गेल्या काही वर्षांपासून शेतकºयांना अपेक्षित उत्पन्न होत नसल्याचे चित्र आहे. यावर्षीही पावसाने दांडी मारल्याने शेतकºयांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. परिसरात पावसाअभावी उगवलेली पिकेही सुकत आहेत. त्यामुळे शेतकºयांनी सिरसोलीचे ग्रामदैवत असलेले श्री गुप्तेश्वर महाराज यांच्या मंदिरामध्ये पाण्यासाठी घट बसवण्यात आला. 
आषाढी एकादशीला व बारसला सकाळी भंडारा झाला. नंतर बारा नक्षत्रांचा गोल घट मांडण्यात आला. या घटामध्ये मधोमध पाण्याचे घंगाळ ठेवण्यात आले, तसेच चौकून गोल रोहिणी नक्षत्रावर अजवान, मृग नक्षत्रावर सोयाबीन, आंदा नक्षत्रावर उडीद, लहान चुकात मूग, पुष्य सरकी, आश्लेशा ज्वारी, मघा नक्षत्रावर बरबटी, पुरभा नक्षत्रावर बाजरी, उतरा नक्षत्रावर तूर, हस्त न क्षत्रावर हरभरा, चित्र नक्षत्रावर तीळ, स्वाती नक्षत्रावर गहू ठेवण्यात आला. गावातून बैलांना सर्व मंदिरातून ढोलाच्या दिंडी भजनांनी दर्शन घेऊन आणले व या घटामध्ये फिरवले. यावेळी गुप्तेश्वर महिला भजन मंडळ व ढोलाचे भजन मंडळ यांनी प्रार्थना केली.       
https://www.dailymotion.com/video/x84576f

Web Title: Video - Declaration of the feet of Mandla Gupteeshwar Maharaj for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.