VIDEO - मुंबईत झाड अंगावर पडून जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 10:35 IST2017-07-22T10:30:51+5:302017-07-22T10:35:52+5:30
चेंबूरच्या स्वस्तिक पार्क परिसरात शुक्रवारी नारळाचे झाड अंगावर कोसळून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा आज सकाळी उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला.

VIDEO - मुंबईत झाड अंगावर पडून जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - चेंबूरच्या स्वस्तिक पार्क परिसरात शुक्रवारी नारळाचे झाड अंगावर कोसळून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा आज सकाळी उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. कांचन दास असे या महिलेचे नाव असून ती याच परिसरात राहणारी आहे.
सकाळी कामावर जात असताना हे झाड तिच्या अंगावर कोसळले. काही रहिवाशांनी तिला तत्काळ एक खासगी रुग्णालयात दाखल केले. या महिलेला रुग्णालयात दाखल केले त्यावेळी तिची प्रकृती गंभीर होती. अखेर आज सकाळी उपचारा दरम्यान तिची प्राणज्योत मालवली.