VIDEO - बीडमध्ये गणेशोत्सवात रिंकू-परशाला पाहण्यासाठी उसळली गर्दी

By Admin | Updated: September 5, 2016 21:31 IST2016-09-05T21:31:32+5:302016-09-05T21:31:32+5:30

परळी येथील नाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या गणेशोत्सवाचे सैराट फेम रिंकू राजगुरू अर्थात आर्ची आणि परश्या यांच्या हस्ते नुकतेच उदघाटन झाले.

VIDEO - The crowd gathered to see Rinku in the Ganesh festival in Beed | VIDEO - बीडमध्ये गणेशोत्सवात रिंकू-परशाला पाहण्यासाठी उसळली गर्दी

VIDEO - बीडमध्ये गणेशोत्सवात रिंकू-परशाला पाहण्यासाठी उसळली गर्दी

ऑनलाइन लोकमत 

बीड, दि. ५ - परळी येथील नाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या गणेशोत्सवाचे सैराट फेम रिंकू राजगुरू अर्थात आर्ची आणि परश्या यांच्या हस्ते नुकतेच उदघाटन झाले. यावेळी रिंकू आणि परश्याला पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. 
 
सकाळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रतिष्ठानच्या श्रीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशोत्सवात दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरूवात आज आर्ची आणि परश्याच्या हस्ते झाली. परळीत आर्चीला पाहण्यासाठी तुडुंब गर्दी झाली आहे.

Web Title: VIDEO - The crowd gathered to see Rinku in the Ganesh festival in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.