VIDEO : अखेरच्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी

By Admin | Updated: August 29, 2016 13:03 IST2016-08-29T12:53:31+5:302016-08-29T13:03:23+5:30

श्रावणातील अखेरच्या चौथ्या सोमवारी भगवान शंकर महादेवाचे दर्शन घेण्याकरिता राज्यभरातून त्र्यंबकेश्वरी भाविकांचा ओघ सुरूच आहे.

VIDEO: A crowd of devotees to Trimbakeshwar on the last Shravani Monday | VIDEO : अखेरच्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी

VIDEO : अखेरच्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी

ऑनलाइन लोकमत
त्र्यंबकेश्वर, दि. २९ -  ‘बम बम भोलेच्या गजरात श्रावणातील अखेरच्या चौथ्या सोमवारी भगवान शंकर महादेवाचे दर्शन घेण्याकरिता राज्यभरातून त्र्यंबकेश्वरी भाविकांचा ओघ सुरूच असून तिर्थराज कुशावर्तावर स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
रविवारी सायंकाळनंतर भाविकांची प्रचंड गर्दी वाढली असून सोमवारी सोमप्रदोष असल्याने भाविकांची आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे.  गर्दीचे नियोजन लक्षात घेता सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असून श्रावणात भगवान शंकराचे दर्शन व उपासना करणे शुभदायक असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. सध्या गणेशोत्सवाची तयारी, त्यात चौथा सोमवार व दुसऱ्या श्रावणी सोमवारप्रमाणे भाविकांनी गर्दी केली. (वार्ताहर)

Web Title: VIDEO: A crowd of devotees to Trimbakeshwar on the last Shravani Monday