VIDEO : ज्वालासुराचा वध बघण्यासाठी भाविकांची गर्दी

By Admin | Updated: September 9, 2016 11:54 IST2016-09-09T10:59:05+5:302016-09-09T11:54:25+5:30

बुलडाण्यातील रूद्र गणेश मंडळाच्यावतीने ज्वालासूराचा वधाचे दृष्य साकारण्यात आले आहे. हे दृष्य पाहण्यासाठी भाविक गर्दी करीत आहेत.

VIDEO: A crowd of devotees to see the flames of Jwalasur | VIDEO : ज्वालासुराचा वध बघण्यासाठी भाविकांची गर्दी

VIDEO : ज्वालासुराचा वध बघण्यासाठी भाविकांची गर्दी

ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. ९ -   येथील रूद्र गणेश मंडळाच्यावतीने ज्वालासूराचा वधाचे दृष्य साकारण्यात आले आहे. हे दृष्य पाहण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील भाविक गर्दी करीत आहेत. यासोबतच या गणेश मंडळाने ‘बेटी बचाओ’ मोहिमेचाही संदेश
दिला आहे.
ज्वालासूर नावाचा राक्षस देव देवतांना त्रास देत होता. अनेक ऋषींची त्याने हत्या केली. त्यामुळे ऋषी मुनी, देव देवतांना ज्वालासुराच्या प्रकोपापासून मुक्ती देण्याकरिता देवाधिदेव इंद्राने ज्वालासुराचा वध केल्याचा देखावा येथील संगम चौकात रूद्र गणेश मंडळाच्यावतीने साकारण्यात आला आहे. उत्कृष्ट लाईटींग व आवाजाच्या बळावर देखावा भाविकांना दाखविण्यात येतो. या देखाव्याची चर्चा संपूर्ण जिल्हयत पोहोचली असून, भाविक हा देखावा पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. दररोज सायंकाळी ७ ते १० वाजताच्या दरम्यान हे दृष्य भाविकांसमोर दाखविण्यात येते.  रूद्र गणेश मंडळातील कार्यकर्त्ये याकरिता श्रम घेत आहेत. सध्या या जगात मुलींना मारण्याची त्यांच्यावर अत्याचार करण्याची जी राक्षसी वृत्ती आहे, तिचा नाश करण्याचा संदेश यातून देण्यात आला आहे.
 
 

Web Title: VIDEO: A crowd of devotees to see the flames of Jwalasur