VIDEO : अपंग हरमिकसिंगची ‘पंजाब टू नांदेड’ सायकलवारी!
By Admin | Updated: September 28, 2016 15:26 IST2016-09-28T15:17:13+5:302016-09-28T15:26:22+5:30
पंजाबमधील युवकाने दोन्ही पायाने अपंग असतांना सुध्दा मनातील श्रध्दा व जिद्दीमुळे चक्क पंजाबवरुन नांदेड सायकलवारी सुरु केली आहे.

VIDEO : अपंग हरमिकसिंगची ‘पंजाब टू नांदेड’ सायकलवारी!
>नंदकिशोर नारे, ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २८ - मनुष्याच्या मनात श्रध्दा, जिद्द व चिकाटी असल्यास तो कोणतेही असाध्य कार्य साध्य करुन दाखवितो. अश्याच पंजाबमधील युवकाने दोन्ही पायाने अपंग असतांना सुध्दा मनातील श्रध्दा व जिद्दीमुळे चक्क पंजाबवरुन नांदेड सायकलवारी सुरु केली आहे. २८ सप्टेंबर रोजी वाशिम येथून जात असतांना नांदेड येथील गुरुव्दारावर जात असल्याची माहिती हरमिकसिंग यांनी दिली.
पंजाबमधील जनता नगर , बठनडा येथील ३२ वर्षिय हरमिकसिंग तीनचाकी सायकलने सायकलवर भगवा झेंडा, थोडक्यात लिहिलेली प्रवासाची माहिती फलक लावून महामार्गावरुन जात असतांना अनेकांचे लक्ष वेधले. हरमिकसींग यांना भेटून विचारणा केली असता नांदेड येथील गुरुव्दारा येथे दर्शनासाठी आपण चाललो आहे. यापूर्वी सुध्दा दोन वेळा सायकलने आपण प्रवास केला आहे. यावेळी १७ आॅगस्ट रोजी आपण पंजाबमधील जनतानगर येथून निघालो असून दररोज २० ते २५ किलोमिटरचा प्रवास करतोय. रस्त्यात आपल्याला पंजाबी ढाबा मालकांकडून मोफत जेवण व राहण्याची व्यवस्था केली जात असल्याची माहिती दिली. पावसामुळे कधी कधी व्यत्यय आल्यास एखादया दिवशी ठरावित अंतर पार केल्या जात नाही.