VIDEO : वान धरणाच्या पाण्यातून गायीचे मॉर्निंग वॉक
By Admin | Updated: August 2, 2016 23:07 IST2016-08-02T23:07:48+5:302016-08-02T23:07:48+5:30
अकोला जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या वान मध्यम प्रकल्पाचे चार वक्रव्दार गुरूवारी ३० सें.मी. ने उघडण्यात आले आहेत.यामधून प्रतिसेंकद ८७.६१ घनमीटर

VIDEO : वान धरणाच्या पाण्यातून गायीचे मॉर्निंग वॉक
- गोवर्धन गावंडे
हिवरखेड, दि. २ - अकोला जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या वान मध्यम प्रकल्पाचे चार वक्रव्दार गुरूवारी ३० सें.मी. ने उघडण्यात आले आहेत.यामधून प्रतिसेंकद ८७.६१ घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या दमदार पावसामुळे इतरही धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे. वान धरणात आजमितीस ६८.१२ दश लक्ष घनमीटर म्हणजेच ८३.१२ टक्के जलसाठा असून या धरणाच्या चार दरवाजांमधून सलग पाचव्या दिवशी सुद्धा पाण्याचा विसर्ग होत आहे. या धरणाच्या पायथ्याशी पडणा-या पाण्याच्या प्रवाहाची गती कमी व्हावी या साठी बांधण्यात आलेल्या बंधा-यासारख्या भिंती अर्थात स्टिलींग बेसींग वरून सकाळी एका गायीने धरणाचे पात्र पार केले. जणू ही गाय या धरणाच्या पाण्यातून मॉर्निंग वॉक करीत होती.