व्हिडीओ - एनडीएचा दीक्षांत सोहळा, हवाई दलाच्या थरारक कसरती
By Admin | Updated: May 31, 2016 13:48 IST2016-05-31T12:41:01+5:302016-05-31T13:48:56+5:30
चार दशकांपूर्वी मीही तुमच्या सारखाच या संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलो.येत्या काळात तुम्ही आपल्या कर्तुत्वाने नक्की उज्वल कराल असा विश्वास आहे असे सदर्न कमांड प्रमुख बिपिन रावत म्हणाले.

व्हिडीओ - एनडीएचा दीक्षांत सोहळा, हवाई दलाच्या थरारक कसरती
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ३१ - चार दशकांपूर्वी मीही तुमच्या सारखाच या संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलो. भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मोठ्या उद्देशाने स्थापन केलेल्या या संस्थेचे नाव येत्या काळात तुम्ही आपल्या कर्तुत्वाने नक्की उज्वल कराल असा विश्वास आहे असे सदर्न कमांड प्रमुख बिपिन रावत मंगळवारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३० व्या तुकडीच्या पदवीप्रदान सोहळयात बोलताना म्हणाले.
तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर यापुढे येणाऱ्या विविध आवाहनांचा सामना करण्यासाठी तुम्ही सक्षम आहात. तुमच्या कुटुंबियांना आणि संरक्षण प्रबोधिनील अभिमान वाटेल असे तुमचे वर्तन असेल असा विश्वास वाटतो.
देशातील प्रत्येक नागरिक आपल्याकडे लष्करातील जबाबदार व्यक्ति म्हणून पाहत असतात. त्यांना आपल्याबद्दल असणारा अभिमान आणि विश्वास याला आपण येत्या काळात पात्र ठरु असे काम करा असे बिपिन रावत म्हणाले. या पदवीप्रदान सोहळयात शानदार संचलनाबरोबर चित्तथरारक कवायती सादर करण्यात आल्या.