VIDEO - भायखळयातील आगीवर फायर ब्रिगेडने मिळवले नियंत्रण
By Admin | Updated: October 29, 2016 20:43 IST2016-10-29T20:06:01+5:302016-10-29T20:43:20+5:30
भायखळा पूर्वेला हुतात्मा बाबू गेनू नगरमध्ये भीषण आग भडकली आहे. फायरब्रिगेडच्या १० गाडया घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

VIDEO - भायखळयातील आगीवर फायर ब्रिगेडने मिळवले नियंत्रण
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - औंरगाबादमध्ये सकाळी फटाक्यांच्या स्टॉल्सना लागलेली भीषण आगीची घटना ताजी असताना शनिवारी संध्याकाळी भायखळा पूर्वेला हुतात्मा बाबू गेनू नगरमध्ये भीषण आग भडकली होती. फायरब्रिगेडच्या १० गाडयांनी मिळून आगीवर नियंत्रण मिळवले.
बाबू गेनू नगरमधील काही घरे रिकामी करण्यात आली. मंडप डेकोरेटरच्या सामनामुळे आग पसरल्याची माहिती मिळत आहे. स्थानिकांच्या सर्तकतेमुळे जिवीतहानी टळली पण लाखो रुपयांचे सामान आगीत भस्मसात झाले आहे. हरीश अर्जुन पालव मार्ग चाळ थोडक्यात बचावली. वखारीच्या उत्तर व दक्षिण बाजूने अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
आणखी वाचा
काही घरेही या आगीत जळाल्याची माहिती असून, शेजारची लाकडाची वखार आगीच्या विळख्यात आल्यामुळे आग अधिकच भडकली होती. तब्बल अर्ध्या तासानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती.शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत अधिक चौकशी करू, अशी प्रतिक्रिया डीसीपी प्रविण पडवळ यांनी दिली. आता कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. औरंगाबादमधल्या आगीत फटाक्यांची २०० दुकाने जळून खाक झाली तसेच २० ते २५ दुचाकी आणि चारचाकी वाहने भस्मसात झाली.