VIDEO- सिंधुदुर्गात काँग्रेस नवसंजीवनीसाठी 'खड्ड्यांचे टॉनिक'
By Admin | Updated: September 26, 2016 15:27 IST2016-09-26T14:39:48+5:302016-09-26T15:27:04+5:30
मुंबई-गोवा महामार्गावरुन दररोज हजारो वाहने ये-जा करतात.

VIDEO- सिंधुदुर्गात काँग्रेस नवसंजीवनीसाठी 'खड्ड्यांचे टॉनिक'
महेश सरनाईक/ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. 26 - मुंबई-गोवा महामार्गावरुन दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यावर्षी झालेल्या संततधार पावसाने महामार्गाची खड्डे पडून चिरफाड झाली आहे. कणकवली ते झाराप या ४० किलोमिटर अंतरावर शेकडो खड्डे असून गणेशोत्सवापूर्वी मातीने आणि काही ठिकाणी प्लेवर बॉक्सने भरलेले खड्डे पुन्हा मूत्यूला आमंत्रण देणारे ठरत आहेत. यावर्षी आतापर्यंत महामार्गावरील खड्यांमुळे दोघांचा मूत्यूही झाला आहे.
कॉग्रेसने सोमवारी प्रशासनाचा निषेध म्हणून स्वखर्चाने ओसरगाव येथे खड्डे बुजविले. सत्ताधारी भाजपने शिवसेनेचे पालकमंत्री असलेल्या दीपक केसरकरांकडे बोट दाखविले आहे. त्यामुळे युतीमध्ये सूडाचे राजकारण सुरू आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या नावाखाली महामार्गाचे नुतनीकरण होणार नाही. त्यामुळे आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी कॉग्रेसला जिल्ह्यात उभारणीसाठी खड्यांचे राजकारण निर्णायक ठरणार आहे.
सिंधुदुर्गात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पिछाडीवर पडलेल्या कॉग्रेस कार्यकत्यांना नवसंजीवनीसाठी खड्यांचे टॉनिक उपयुक्त ठरणार आहे. महामार्गावरील खड्डे राजकारणात अडकल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.