VIDEO : भाजपासोबत मतभेदांबरोबरच टोकाचे मनभेद - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: February 7, 2017 16:23 IST2017-02-07T16:12:24+5:302017-02-07T16:23:09+5:30
ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 7 - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीका केली असून भाजपसोबत मतभेदांबरोबरच ...

VIDEO : भाजपासोबत मतभेदांबरोबरच टोकाचे मनभेद - उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीका केली असून भाजपसोबत मतभेदांबरोबरच टोकाचे मनभेद झाले असल्याचं बोलले आहेत. एकीकडे मुख्यमंत्री पाच वर्ष माझ्या सरकारला धोका नाही असं सांगत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी राज्याच्या सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. पाटीदार आंदोलनाचा प्रमुख हार्दिक पटेलसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.
'लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही त्यांच्यासोबत होतो. विधानसभेत त्यांनी युती तोडली. आता महापालिकेत आम्ही युती तोडली. एखाद्या गोष्टीत मनच रमत नसेल तर त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही. म्हणून या राजकारणाला पूर्णविराम द्यायची आवश्यकता आहे', असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
https://www.dailymotion.com/video/x844qml