शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

EVM हॅकिंगचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल;  निवडणूक आयोगाने दिलं सविस्तर स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 16:58 IST

ईव्हीएम हॅक केल्याचा दावा दिशाभूल करणारा असल्याचं सांगत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. 

Election Commission ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांसह अन्य काही घटकांकडून ईव्हीएमबाबत संशय व्यक्त केला जात आहे. अनेक पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्जही दाखल केला आहे. त्यातच ईव्हीएम हॅक केल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देत ईव्हीएम हॅक केल्याचा दावा दिशाभूल करणारा असल्याचं सांगत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. 

"सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील व्यक्तीकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक केल्याचा चुकीचा आणि निराधार दावा केला जात आहे. महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून याप्रकरणी तक्रार करण्यात आल्यानंतर मुंबईत व्हायरल व्हिडीओतील व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे," अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना निवडणूक आयोगाने म्हटलं आहे की, "ईव्हीएमला वायफाय, ब्ल्यूट्यूथ किंवा इतर कोणत्याही यंत्रणेने जोडता येत नाही. त्यामुळे ईव्हीएम हॅक होण्याचा प्रश्नच नाही. माननीय सुप्रीम कोर्टाने अनेकदा ईव्हीएमवर विश्वास व्यक्त केला आहे. ईव्हीएमबाबत असलेल्या सर्व शंकांचं निरसन व्हावं, यासाठी आम्ही आमच्या वेबसाइटवर सर्व माहिती दिली आहे."

दरम्यान, ईव्हीएमबाबत चुकीची माहिती पसरवत निराधार दावा केल्यामुळे याच व्यक्तीविरोधात दिल्लीतही २०१९ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता, असंही निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग