शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

VIDEO : सांगलीतील चौंडेश्वरी देवीचा भावई उत्सवाचा जल्लोष

By admin | Published: June 23, 2017 12:43 PM

ऑनलाइन लोकमत सांगली, दि. 23-  आष्टा येथील श्री चौंडेश्वरी देवीचा भावई उत्सवात शुक्रवारी देवीने जोगणी रूपात दैत्याचा शोध घेतला. ...

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 23-  आष्टा येथील श्री चौंडेश्वरी देवीचा भावई उत्सवात शुक्रवारी देवीने जोगणी रूपात दैत्याचा शोध घेतला. भावईतील हा प्रमुख खेळ पाहण्यास व जोगणी रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
 
कर्नाटकातील बदामी येथील भावई उत्सव आष्ट्यात पारंपरिक पद्धतीने खेळला जातो. बारा बलुतेदार, खेळगडी, मानकरी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. देवीने चंडिका अवतार घेऊन प्रजेस त्रास देणाऱ्या चंड-मुंड राक्षसाचा वध केला होता.
त्यावेळी राक्षसाने विविध रूपे घेतली होती. तशीच रूपे देवीनेही घेतली होती. आळूमुळू, पिसे या दैत्य रूपानंतर देवीने जोगणी रूप घेऊन ती सहकाऱ्यांसह दैत्याच्या शोधासाठी बाहेर पडली होती, अशी आख्यायिका आहे.
 
त्यानुसार येथेही त्या युद्धाचा खेळ खेळला जातो. एक दमामे पाटील व दोन सुतार जोगणी मंदिरातून तर चौथी कुंभार जोगणी कुंभार वाड्यातून रंगून यामध्ये सामील झाली. पारंपरिक पोशाख जोगणी होत्या. या जोगण्यांची प्रमुख मानकऱ्यांच्या घरी पूजा होते. जोगण्यांपुढे रणशिंग, संबळ, चौंडके, कैताळ अशी वाद्ये लयीत वाजवली जातात. नगारे, छत्री, वाद्ये यासर्व लवाजमा प्रमुख मार्गावरून जातो. यावेळी भाविक दर्शन घेतात. 
 
प्रथम पूजेचा मान मातंग समाजाचा असून त्यानंतर परीट, थोरात, पाटील, कुलकर्णी, महाजन यांच्या पूजा घेतल्या जातात. यावेळी लयीत वाद्य वाजवीत गाणी म्हणतात. पहाटे मंदिरातून निघाल्यानंतर दुपारी जोगण्या मंदिरात जातात.                        
 
 
 
 
 
https://www.dailymotion.com/video/x84566g