VIDEO - चासकमान धरण पुन्हा ओव्हर फ्लो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 22:15 IST2016-08-05T21:57:58+5:302016-08-05T22:15:54+5:30
चासकमान धरण पाणलोट क्षेञात पावसाचा जोर पुन्हा वाढला असुन,चासकमान धरणाचे पाचही दरवाजे उघडून भिमानदी पाञात १४४५७ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.

VIDEO - चासकमान धरण पुन्हा ओव्हर फ्लो!
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ५ : चासकमान धरण पाणलोट क्षेञात पावसाचा जोर पुन्हा वाढला असुन,चासकमान धरणाचे पाचही दरवाजे उघडून भिमानदी पाञात १४४५७क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.
धरण पाणलोट क्षेञात दि. ४ रोजी पावसाने उघडीप दिली होती.यामुळे सायंकाळी सहा वाजता धरणातुन सोडण्यात आलेला विसर्ग कमी करून तो २१३२ क्युसेक्स करण्यात आला होता.परंतु दि.५ रोजी सकाळी १० वाजेपासुन धरण पाणलोट क्षेञात दमदार पावसाला सुरवात झाली असुन,खबरदारीचा उपाय म्हणुन चासकमान धरणातुन भिमानदी पाञात १४४५७क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
अशी माहीती शाखा अभियंता एस.एन.भुजबळ यांनी दिली. पाणलोट क्षेञात पाऊस वाढून धरणात पाण्याची आवक वाढली असता नदी पाञातील विसर्ग जास्त करण्यात येईल असा सावधनतेचा इशारा धरण खात्यामार्फत नदीकाठील नागरीकांना देण्यात आला आहे.धरण परिसरात दिवसभरात १९ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.