VIDEO : अकोल्यात गुरुनानक जयंती उत्साहात साजरी
By Admin | Updated: November 14, 2016 16:00 IST2016-11-14T15:45:56+5:302016-11-14T16:00:04+5:30
शीख धर्मियांचे गुरु श्री गुरुनानकदेवजी यांची जयंती अकोल्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

VIDEO : अकोल्यात गुरुनानक जयंती उत्साहात साजरी
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १४ - शीख धर्मियांचे गुरु श्री गुरुनानकदेवजी यांची जयंती मोठ्या शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. श्री गुरुदवारा प्रबंधक समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त शहरातील विविध गुरुदवारांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या निमित्त २ नोव्हेंबरपासूनच दररोज प्रभातफेरी काढण्यात येत आहे. स्टेशन परिसरातील गुरुद्वारा येथे विविध कार्यक्रम पार पडले. सोमवारी सकाळी अखंड पाठची समाप्ती झाली. त्यानंतर निशान साहिब चोला बदलण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर दुपारी गुरुपुरब किर्तन, गुुरुची संगत व लंगरमध्ये प्रसाद वितरणाचा कार्यक्रम झाला. शीख नागरिकांनी गुरुदवारेत जाऊन दर्शन घेतले. यामुळे शहरात चैतन्याचे वातावरण होते.