व्हिडिओ - नदीच्या पुरात ट्रक गेला वाहून

By Admin | Updated: June 20, 2016 12:09 IST2016-06-20T12:09:17+5:302016-06-20T12:09:17+5:30

दुथडी भरून वाहणाऱ्या मलप्रभा नदीवरील पूल ओलांडण्याच्या नादात नादात ट्रक वाहून गेल्याची घटना बेळगावमध्ये घडली आहे

Video - carry truckloads of water in the river | व्हिडिओ - नदीच्या पुरात ट्रक गेला वाहून

व्हिडिओ - नदीच्या पुरात ट्रक गेला वाहून

>ऑनलाइन लोकमत - 
बेळगाव, दि. 20 - दुथडी भरून वाहणाऱ्या मलप्रभा नदीवरील पूल ओलांडण्याच्या नादात नादात ट्रक वाहून गेल्याची घटना बेळगावमध्ये घडली आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की ट्रक पाण्यात वाहून गेला. गदग जिल्ह्यातील कोन्नूर येथे ही दुर्घटना घडली. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. हा ट्रक हुबळीहून बागलकोटकडे निघाला होता. सुदैवाने चालक, क्लिनर बचावले आहेत. 
 
गदग जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मलप्रभा नदी पात्राबाहेर वाहत आहे. रविवारी संध्याकाळी एक ट्रक मलप्रभा नदीवरील पूल ओलांडत होता. त्यावेळी गावक-यांनी ट्रक चालकाला तेथेच थांबण्यास सांगितले. पण चालकाने लोकांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. अतीआत्मविश्वात चालकाने पाणी भरून वाहणाऱ्या पुलावर ट्रक आणला. मात्र पाण्यात ट्रकचा टिकाव लागला नाही आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ट्रक नदीत वाहून गेला. 
 
ट्रक नदीत बुडताना चालक आणि क्लिनर मात्र आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरले. ट्रक हुबळीहून बागलकोटकडे निघाला होता. ट्रक मध्यप्रदेशचा होता . 
 

Web Title: Video - carry truckloads of water in the river