VIDEO : पोलिसानं तरुणाच्या अंगावर घातली कार

By Admin | Updated: May 2, 2017 12:53 IST2017-05-02T12:50:06+5:302017-05-02T12:53:09+5:30

ठाण्यामध्ये आर्थिक वादातून एका पोलीस कॉन्स्टेबलनं एका तरुणाच्या अंगावर गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

VIDEO: The car inserted on the body of a policeman | VIDEO : पोलिसानं तरुणाच्या अंगावर घातली कार

VIDEO : पोलिसानं तरुणाच्या अंगावर घातली कार

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 2 - आर्थिक वादातून एका पोलीस कॉन्स्टेबलनं एका तरुणाच्या अंगावर गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.  रमेश आवटे असे संबंधित पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून ते मुंबई पोलिसांच्या स्पेशल क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत आहेत. 
 
21 एप्रिल रोजी ठाण्यातील पाचपाखाडी भागातल्या प्रशांत कॉर्नरच्या बाहेर ही घटना घडली आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, पैशांच्या वादातून झालेल्या भांडणामुळे रमेश आवटे यांनी या तरुणाच्या अंगावर थेट कार घालण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं हा घटनेतून तरुण बचावला आहे.
 
या तरुणाचे नाव अतुल पेठे असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे रमेश आवटे आणि अतुल पेठे दोघं एकमेकांचे मित्र आहेत.आर्थिक वादातून अतुलनं रमेश यांची पोलिसात तक्रार केली. याचाच राग मनात ठेऊन आवटेंनी अतुलच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी पेठेंनी गाडीच्या बॉनेटवर झेप घेतल व ते बचावले. 
 
पण आवटे मात्र काही थांबले नाहीत त्यांनी अतुलला काही अंतर तसंच फरफटत नेलं. यावेळी परिसरातील उपस्थितांनी आरडाओरडा केल्यामुळे अतुलचा जीव वाचू शकला.  दरम्यान, यासंदर्भात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसाच्या मुसक्या अद्यापपर्यंत आवळण्यात आलेल्या नाहीत.  

Web Title: VIDEO: The car inserted on the body of a policeman