VIDEO: नाशिक बाजारात डाळींब खरेदी करताना व्यापा-यांना करावी लागतीये घासाघीस
By Admin | Updated: September 5, 2016 15:07 IST2016-09-05T15:07:29+5:302016-09-05T15:07:29+5:30
दिंडोरी तालुका हा द्राक्ष पंढरी संबोधला जाणारा तालुका असुन आता या तालुक्यात द्राक्षासोबत डाळींबांचे देखील पिक बळीराजा घेऊ लागला आहे

VIDEO: नाशिक बाजारात डाळींब खरेदी करताना व्यापा-यांना करावी लागतीये घासाघीस
>- ऑनलाइन लोकमत
पांडाणे (नाशिक), दि. 5 - दिंडोरी तालुका हा द्राक्ष पंढरी संबोधला जाणारा तालुका असुन आता या तालुक्यात द्राक्षासोबत डाळींबांचे देखील पिक बळीराजा घेऊ लागला आहे. दिंडोरी व चांदवड तालुक्यात डाळींबशेती मोठया प्रमाणावर लागवड होत आहे .दिंडोरी तालुक्यात भनवड ,खेडगाव, कोशिंबे, दहीवी, वागळूद व् चांदवड तालुक्यात पारेगाव, वडनेर, सोग्ग्रास, बाहादुरी, राहूड, उसवाड, करंमळ या परिसरात मोठया प्रमाणात डाळींब असल्याने पिक चांगले आलें आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने डाळींब पिकाला बाजारात चांगली मागणी आहे . शेतकऱ्यांकडून (आठहजार रुपये प्रतिक्विटल ) व्यापारी ऐंशी रूपयाने सरसकट प्रति किलो घेवून ती छाननी करुन खराब झालेला डाळींब सुद्धा ऐंशी रुपयेच घ्यावा लागत असल्यामुळे व्यापारी वर्गाला डाळींबाचे खरेदी करतांना घासघीस करावी लागते.