VIDEO : नाशिकमध्ये 'द बर्निंग ट्रक'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2017 11:51 IST2017-03-16T09:02:06+5:302017-03-16T11:51:30+5:30
ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 16 - नाशिकहून मुंबईकडे जाणा-या ट्रकने (MH 40 Y 4067) राणेनग येथील उड्डाणपुलावर अचानक पेटल ...

VIDEO : नाशिकमध्ये 'द बर्निंग ट्रक'
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 16 - नाशिकहून मुंबईकडे जाणा-या ट्रकने (MH 40 Y 4067) राणेनग येथील उड्डाणपुलावर अचानक पेटल घेतला. या अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. ट्रकने अचानक पेट घेतल्याने खबरदारी म्हणून पोलिसांनी उड्डाणपुलावरील वाहतूक थांबवली.
घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, घटना घडण्यापूर्वी ट्रकच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक पुलाच्या संरक्षक कठड्याच्या शेजारी उभा करुन तो वाहनातून बाहेर आला. आणि काही वेळातच ट्रकमधून मोठ्या आगीच्या ज्वाळा येऊ लागल्या.
https://www.dailymotion.com/video/x844u89