VIDEO : धुळ्यात राष्ट्रवादीतर्फे महादेव जानकरांच्या पुतळ्याचे दहन
By Admin | Updated: October 13, 2016 13:00 IST2016-10-13T12:51:00+5:302016-10-13T13:00:06+5:30
भगवान गडावरील भाषणादरम्यान शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीका करणा-या महादेव जानकरांचा पुतळा धुळ्यातील शिंदखेडा येथे जाळण्यात आला.

VIDEO : धुळ्यात राष्ट्रवादीतर्फे महादेव जानकरांच्या पुतळ्याचे दहन
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. १३ - भगवान गडावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, व अजित पवार, यांच्यवर शिवराळ भाषेत वक्तव्य केले म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी त्यांचा पुतळा दहन करण्यात आला या पुढे असा कोणी प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार रामकृष्ण पाटील, व रा कॉ युवक जिल्हा अध्यक्ष सत्त्यजित सिसोदे, सरचिटणीस अरुण देसले यांनी दिला या प्रसंगी राष्ट्रवादी चे आर आर पाटील, राहुल कचवे,निलेश पाटील, राउफ बागवान,किरण जाधव, विजय महाले, चेतन पाटील, रवींद्र माळी, रावसाहेब बैसाने,विकास माळी आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.