VIDEO : जन्मदात्या आईला पंख्याला लटकावलं, नराधम मुलाला अटक
By Admin | Updated: September 29, 2016 14:22 IST2016-09-29T10:03:43+5:302016-09-29T14:22:45+5:30
जन्मदात्या आईला पंख्याला उलटं लटकावणा-या नराधम मुलाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

VIDEO : जन्मदात्या आईला पंख्याला लटकावलं, नराधम मुलाला अटक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - जन्मदात्या आईला पंख्याला उलटं लटकावणा-या नराधम मुलाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अंधेरीत हा घृणास्पद प्रकार घडला असून अत्याचार करणा-यांमध्ये पीडित महिलेची सून व नातीचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८० वर्षीय मायावती वैद्य या अंधेरीत मुलगा, सून व नातीसह राहतात, मात्र गेल्या तीन वर्षांपासून मुलगा सुरेंद्र सत्तार वैद्य, त्यांचा अतोनात छळ करत असे. जन्मदात्या आईला मारहाण करण्यासोबतच त्याने मायावती यांना पंख्याला उलंट लटकवण्याचा अघोरी प्रकारही केला आहे. मुख्य म्हणजे सुरेंद्रची पत्नी व मुलीचाही या कृष्णकृत्यात सहभाग असून त्यांनी या घटनेचा व्हिडीओही शूट केला असून वयोवृद्ध मायावती रडत असताना त्या दोघा मात्र निर्दयीपण हसत होत्या. नराधम मुलगा ओढणी पंख्याला बांधून, ती आईच्या पायात अडकवून तिला ओढत असतानाचे दृष्य त्या व्हिडीओतही दिसत आहे.
महिलांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी पीडित मायावती वैद्य यांना रुग्णालयात दाखल केलं असून आरोपी मुलाला अटक केली आहे. तसेच या धक्कादायक प्रकारात सुरेंद्रला मदत करणारी त्याची पत्नी आणि बहिणीविरोधातही डीएननगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलगा, सून आणि मुलीला आज अंधेरी कोर्टात सादर करण्यात येणार आहे.