VIDEO : भिवंडी महानगरपालिकेच्या कामगारांचे भीक मांगो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 16:01 IST2016-11-03T11:53:35+5:302016-11-03T16:01:30+5:30

भिवंडी महानगर पालिकेच्या कामगार कर्मचाऱ्यांना महापौरांनी जाहीर केलेले अनुदान पैसे नसल्याचा बहाणा करणाऱ्या आयुक्तांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्यात आले.

VIDEO: Bhiwandi municipal corporation's workers demand bills | VIDEO : भिवंडी महानगरपालिकेच्या कामगारांचे भीक मांगो आंदोलन

VIDEO : भिवंडी महानगरपालिकेच्या कामगारांचे भीक मांगो आंदोलन

ऑनलाइन लोकमत
भिवंडी, दि. ३ - भिवंडी महानगर पालिकेच्या कामगार कर्मचाऱ्यांना महापौरांनी जाहीर केलेले अनुदान पैसे नसल्याचा बहाणा करणाऱ्या आयुक्तांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आज मनपा मुख्य कार्यालयापासून प्रांत कार्यालयावर कामगार कर्मचारी संघर्ष कृती समिती च्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे,
कामगार कर्मचाऱ्यांचा पगार व देणी देण्यास असमर्थ असलेली महानगरपालिका बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करा, आरोग्य विभागाचे नियंत्रण अधिकारी सुभाष झळके यांची त्या पदावरून हकालपट्टी करा, सानुग्रह अनुदान व बकरी इदचा भत्ता त्वरित देण्यात यावा, आस्थापना विभाग व आरोग्य विभाग आणि सामान्य प्रशासनाचा कार्यभार शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांकडे सोपवावा. तसेच प्रॉव्हीडेन्ट फंड, एलआयसी, गृह कर्जाचे हप्ते जे पगारातून कपात केले जातात ते संबंधित विभागाकडे त्वरित पाठविण्यात यावेत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची देणी त्वरित देण्यात यावीत या व अशा अनेक मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यासाठी सर्व कामगार कर्मचाऱ्यानी आपल्या हक्कासाठी उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन एड. किरण चन्ने, महेंद्र गायकवाड, संतोष चव्हाण, घनश्याम गायकवाड, भगवान साळवी, भगवान जाधव, राजू चव्हाण, अशोक आडे, राजेश जाधव यांनी केले.
 
फोटो- रोशन घाडगे
 

 

Web Title: VIDEO: Bhiwandi municipal corporation's workers demand bills