VIDEO : बेस्टने घेतला पेट, सुदैवाने जीवितहानी टळली
By Admin | Updated: January 15, 2017 19:07 IST2017-01-15T19:03:03+5:302017-01-15T19:07:51+5:30
ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 15 - बेस्ट परिवहनच्या मुलुंडहून अंधेरीकडे जाणाऱ्या बसला चकाला चर्च येथे आज दुपारी 1.50 च्या ...

VIDEO : बेस्टने घेतला पेट, सुदैवाने जीवितहानी टळली
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - बेस्ट परिवहनच्या मुलुंडहून अंधेरीकडे जाणाऱ्या बसला चकाला चर्च येथे आज दुपारी 1.50 च्या सुमारास आग लागली. ही बस चकाला चर्च येथे आली असता बसच्या इंजिन मधून आवाज आला. त्यामुळे बसचालक बसमधून खाली उतरले आणि त्यांनी प्रवाशांनाही बसमधून खाली उतरवले. एवढ्यात बसच्या खालील भागात स्पोट झाला आणि बसला आग लागली . ही आग पसरून शेजारी उभ्या असलेल्या मारुती कारलाही आग लागली. अखेर फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी ती आग विझवली. या बसमधूम सात ते आठ प्रवासी प्रवास करत होते. मात्र या अपघातात प्रवाशांना कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. पण अचानक लागलेल्या आगीमुळे भीतीचे वातावरण पसरले होते
https://www.dailymotion.com/video/x844oey