VIDEO - राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश पदयात्रेस सुरुवात
By Admin | Updated: May 22, 2017 14:15 IST2017-05-22T11:45:59+5:302017-05-22T14:15:01+5:30
ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 22- स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या करजमाफीसाठी पुण्यातून महात्मा फुले ...

VIDEO - राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश पदयात्रेस सुरुवात
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 22- स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या करजमाफीसाठी पुण्यातून महात्मा फुले वाडा येथून सोमवारी आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव,लक्ष्मी त्रिपाठी यांच्यासह विविध संस्था संघटनांच्या प्रतिनिधींनी पदयात्रेत सहभाग घेतला. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलेही दिंडी काढून पदयात्रेत सहभागी झाले.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जातील शेतकऱ्यांच्या मालाला रास्त दर दिला जाईल असे आश्वासन दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही.
भाजपला निवडून देण्याचे आवाहन आम्ही केले होते.त्यामुळे या सरकारला निवडून आणण्यात अमचाही वाटा आहे. त्यामुळे पश्चाताप घेण्यासाठी ही आत्मकलेश पदयात्रा काढत असल्याचे राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले.
https://www.dailymotion.com/video/x844zai