VIDEO - दिव्यांग मुलींची सुंदर व आकर्षक कलाकृती
By Admin | Updated: September 20, 2016 17:26 IST2016-09-20T17:24:31+5:302016-09-20T17:26:04+5:30
मराठवाडयातील लातूर शहरातील सुरभी महावीर डागळे व स्रेहल राजेंद्र डुंगरवाल या दिव्यांग युवतींनी स्वत:च्या कल्पकतेतून सुुंदर व आकर्षक हस्तकला चित्रकृती प्रदर्शनीत अनेकांची दाद मिळविली

VIDEO - दिव्यांग मुलींची सुंदर व आकर्षक कलाकृती
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि २० : मराठवाडयातील लातूर शहरातील सुरभी महावीर डागळे व स्रेहल राजेंद्र डुंगरवाल या दिव्यांग युवतींनी स्वत:च्या कल्पकतेतून सुुंदर व आकर्षक हस्तकला चित्रकृती प्रदर्शनीत अनेकांची दाद मिळविली. लातुरच्या सदगुरु जिवराज भवन भगवान महावीर चौक येथे आयोजित या प्रदर्शनीला वाशिम जिल्हयातील ५० च्या जवळपास नागरिकांची उपस्थिती लाभली होती.
स्रेहल व सुरभी हे लहानपणापासूनच जन्मत: मुके व बहिरे आहेत.
नियतिने या दोन्ही मुलींना दिव्यांग जरी केले असले तरी त्यांच्यामध्ये बुध्दी क्षमता, कल्पकता, जिद्द आणि चिकाटी आदि गुणामुळे लहानपणापासूनच या दोन्ही युवतींनी आपल्या हस्तकलेल्या माध्यमातून चित्र कलाकृतीचे गुण विकसीत केलेत. श्री गुरु गणेश ग्रंथालय लातुरच्यावतिने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त , जैनमुनी चारित्र्य चुडामणी, परमपुज्य श्रध्देय जीवराजजी महाराज यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त २० सप्टेंबर रोजी या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये या दिव्यांग मुलींनी काढलेल्या चित्रकृतीने प्रेक्षकांची दाद मिळविली.