शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

VIDEO - अनाथ, निराधार आयुष्याचा 'तो' बनला आधार

By admin | Updated: August 25, 2016 17:51 IST

बालपणीच आईवडीलांचे छत्र हरविले. निराधार झालेल्या तिला काकांनी आधार दिला. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ती हरवली...भटकली. चिमुकला जीव, कुठे जावे तिला कळेना

नितिन गव्हाळे

 अकोला, दि. 25 -  बालपणीच आईवडीलांचे छत्र हरविले. निराधार झालेल्या तिला काकांनी आधार दिला. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ती हरवली...भटकली. चिमुकला जीव, कुठे जावे तिला कळेना. कुणीतरी तिला बालगृहात आणलं. वर्षामागून वर्ष सरत होती. ती आता मोठी झाली होती. तिला अकोल्यातील महिला राज्यगृहात दाखल केलं. मनोमन तिच्या विचारांचं काहूर सुरू झालं होतं. कसं होईल पुढे.

काय भविष्य असेल आपलं. निराधार, अनाथ मनाला कोण स्विकारणार. अशा विचारात असतानाच, संदीप नावाचा तरूण तिच्या अनाथ, निराधार आयुष्याचा सोबती बनण्यासाठी पुढे आला...आणि गुरूवारी दोघांच्या रेशिमगाठी बांधल्या गेल्या. तिच्या निराधार आयुष्याला आता आधार मिळाला.

चित्रपटातील कथानक वाटावं. अशीच काहीशी पूजा माळी हिची कथा आहे. पूजा ही मूळची हरियाणाची. बालपणीच आईवडील गेले. काकांनी सांभाळ केला. परंतु एक दिवस पूजा हरवली...भटकली आणि अमरावतीच्या बालगृहात आली. तिच्या नातेवाईकांचा शोध लागला नाही. बालगृहातच पूजा मोठी होत होती. लिहीणे, वाचणे शिकली. पूजा संमजस, सज्ञान झाल्यावर तिला अकोल्यातील महिला राज्यगृहात दाखल करण्यात आलं. पूजा लग्नाला आली. तिच्या भवितव्याची चिंता महिला राज्यगृहातील महिला कर्मचाऱ्यांनाही सतावत होती.

पूजालाही जाणीव व्हायला लागली. निराधार, अनाथ असलेल्या आपल्यासारख्या मुलीचा कोण स्विकार करेल. कोण आपल्या जीवनाचा सोबती बनेल. अशा विचारात ती गढून जायची. म्हणतात ना, जिसका कोई नही...उसका खुदा होता है...पूजाच्या आयुष्यातही असंच काहीस घडलं. महिला राज्यगृहाच्या अधीक्षिका रंजना कंकाळ यांच्या अपार्टमेंटमध्ये वर मुलाची बहिण राहते. ओळख असल्याने, वराच्या बहिणीने भावासाठी मुली पाहत असल्याचे त्यांना सांगितले. परंतु एकही मुलगी पसंतीस पडत नसल्याचे सांगितले. दिनकर कंकाळ यांनी महिला राज्यगृहात एक मुलगी आहे. सालस, गुणवान मुलगी आहे. तुमची काही हरकत नसेल तर तुमच्या भावाला दाखवा.

त्यांनी लगेच भाऊ संदीप जेठवा(रा. विरार मुंबई) याला बोलावून घेतले. संदीपने पुजा पाहिले. ती कोण कुठली, तिची जात काय, गोत्र काय...हुंडा मिळणार नाही. याचा कोणताही विचार न करता त्याने पूजासोबत लग्न करण्याचा निर्धार केला. संदीपचे तीन भाऊ, आईवडील, बहिणींनी सुद्धा होकार दिला. लग्नाची तारीख ठरली २४ आॅगस्ट. संदीप व पूजाने नोंदणी पद्धतीने विवाह केला. अंधारलेल्या पूजाच्या आयुष्यात प्रकाश उजळला. अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी पूजाला मिळाला आधारशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी मनात आणले तर अनेक सकारात्मक व समाजोपयोगी बदल घडून येऊ शकतात. हे निराधार पूजासाठी केलेल्या प्रयत्नांतून दिसून येते. अधिकारी, कर्मचारी पूजाचे भाऊ, बहिण, काका, मामा झाले. वर संदीपने विवाहाची तयारी दर्शविल्यानंतर या अधिकाऱ्यांनी त्याचे शिक्षण, नोकरी, कुटूंबाची पाश्वभूमि याची माहिती गोळा केली. संदीप चांगल्या कटूंबातील मुलगा असल्याने, त्यांनी पूजाच्या विवाहासाठी महिला व बालकल्याण आयुक्तालय पुणे यांची परवानगी मिळविली.अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून स्वागत समारोहनिराधार पूजा संदीपसोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर महिला व बालकल्याण, समाजकल्याण, बालकल्याण समितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नवदाम्पत्यासाठी गुरूवारी महिला राज्यगृह कार्यालयात स्वागत समारोह आयोजित केला. त्यासाठी महिला व बालकल्याण उपायुक्त माधव बोरखेडे, महिला व बालकल्याण अधिकारी विशाल जाधव, अधीक्षिका रंजना कंकाळ, बालकल्याण समितीचे अध्यक्ष संजय सेंगर, गिरीश पुसदकर, जयश्री वाढे, समाजकल्याणचे साहाय्यक आयुक्त शरद चव्हाण, राजेश देशमुख, स्वप्ना लांडे, भालेकर, मोहुरले पुढे आले. पूजाला भरूभरून भेटवस्तू व रोख खाऊ दिला. अधिकाऱ्यांचे आदरातिथ्य पाहून वराकडील मंडळी भारावून गेली होती.