शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

VIDEO - लाखोंच्या अलंकारांनी नटणार बाप्पा !  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 9:13 PM

- स्नेहा मोरे मुंबई, दि. 17 - आठवड्याभर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचे वेध अवघ्या मुंबापुरीला लागले आहेत. चित्रशाळेतून ढोलताशांच्या गजरात ...

- स्नेहा मोरेमुंबई, दि. 17 - आठवड्याभर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचे वेध अवघ्या मुंबापुरीला लागले आहेत. चित्रशाळेतून ढोलताशांच्या गजरात गणेशोत्सवाच्या उंचच उंच मूर्तींचे आगमन सोहळेही सुरु झाले आहेत. याच लाडक्या बाप्पाला सजण्या-नटण्यासाठी आता अलंकारांवरही शेवटचा हार फिरला असून लवकरच बाप्पाच्या मूर्तीवर हे अलंकार गणेशभक्तांचे डोळ्यांचे पारणे फेडताना दिसतील. गिरगावातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ सुवर्णकार नाना वेदक यांनी घडविलेला १५ किलोंचा बाप्पाचा मुकुट यंदा लक्षवेधी ठरणार आहे.नाना वेदक यांनी यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासांठी एकूण ७०-८० किलोचे दागिने घडविले असून ते जवळपास ४० लाखांच्या घरात आहेत. शहर-उपनगरातील शिवडीचा राजा, अंधेरीचा राजा, फोर्टचा इच्छापूर्ती, चारकोपचा राजा, विरारचा महाराजा, गिरगावचा राजा, खेतवाडीचे बाप्पा इ. मंडळांनी अलंकारांसाठी यंदा आॅडर्स दिल्याचे वेदक यांनी  लोकमतशी बोलताना सांगितले. तर यंदा घाटकोपर येथील अल्ताफनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने १५ किलोच्या जवळपास १५ लाखांचे मुकुट घडविल्याचे नाना यांनी सांगितले. तसेच, सर्वाधिक मागणी आशीर्वादाच्या हाताला आणि सोनपावलांना असल्याचेही त्यांनी सांगितले.गेल्या २५ वर्षांपासून दागिन्यांची जडणघडण करत असलेले नाना या प्रक्रियेविषयी सांगताना म्हणाले की, चांदीला सोन्याचे फॉर्मिंग करुन हे अलंकार बनविले जातात. यात केवळ चांदी नव्हे तर सोन्याचाही समावेश असतो. या अलंकारांच्या जडणघडणीचे काम मार्च - एप्रिलमहिन्यापासून सुरु होते. गणेशमूर्तींचे साचे पाहून त्याप्रमाणे अलंकार घडविले जातात. दरवर्षीप्रमाणे लालबागचा राजा आणि गणेशगल्लीच्या बाप्पाचे प्रत्येकी जवळपास १७ किलोंच्या अलंकारांच्या नूतनीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. जीएसटीचा परिणाम नाहीनोटाबंदी आणि जीएसटीनंतरचा पहिलाच गणेशोत्सव असूनही अलंकारांच्या बाजारपेठेवर त्याचा तितकासा परिणाम झालेला नाही. कारण गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाच्या सेवेखातर वस्तू सेवा कर भरुन अलंकार घडविल्याचे नाना यांनी सांगितले. उंदीरमामा, गदा रवाना होणार हैदराबादलालालबागच्या राजाचा थाट पाहून हैद्राबाद येथील एका गणेशोत्सव मंडळाने नानांकडून खास राजासारखी गदा आणि उंदीर मामा घडविण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे, उंदीरमामा आणि ५ किलो वजनाची जवळपास तीन लाख रुपयांची गदा तयार असून लवकरच हैद्राबादला रवाना होणार आहे. बाप्पाच्या अलंकारांचा थाटगदा ५ किलो ३ लाखमुकुट १५ किलो १५ लाखआशीर्वादाचा हात साडेतीन किलो दोन लाखतोडे दीड किलो सव्वा लाखदोन पाऊल दीड किलो सव्वा लाखसोंडपट्टा ८०० ग्रॅम ६० हजारछोटा आशीर्वादाचा हात ७०० ग्रॅम ५० हजारभिकबाळी १०० ग्रॅम १० हजार

 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव