VIDEO : बच्चनवेडे कोल्हापुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2016 00:52 IST2016-08-14T00:52:12+5:302016-08-14T00:52:12+5:30
‘आदमी जो कहता है’, ‘ओ साथी रे’, ‘अपनी तो जैसे तैसे’ अशा एक से बढकर एक गाण्यांच्या सुरांनी कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह शनिवारी बच्चनमय होऊन गेले.

VIDEO : बच्चनवेडे कोल्हापुरी
- मकरंद देशमुख
कोल्हापूर, दि.१४ - ‘आदमी जो कहता है’, ‘ओ साथी रे’, ‘अपनी तो जैसे तैसे’ अशा एक से बढकर एक गाण्यांच्या सुरांनी कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह शनिवारी बच्चनमय होऊन गेले. निमित्त होते किशोरकुमार यांच्या जयंतीदिनाचे.
येथील बच्चनवेडे ग्रुपने या गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अमिताभ बच्चन यांना किशोरकुमार यांनी दिलेल्या आवाजातील गाणी सादर करण्यात आली. विशेष म्हणजे हातकणंगले मतदारसंघाचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनीही गाणे सादर करून कार्यक्रमाला वेगळीच जान आणली. अभिनेता स्वप्नील राजशेखर, अनिल घाडगे, अमृता पाटील, नितीन सोनटक्के, रेशमी मुखर्जी, सूरज नाईक आदींनी गाणी म्हणून कार्यक्रम बहारदार केला.