VIDEO : ठाण्यात खासगी बस उलटून 16 प्रवासी जखमी
By Admin | Updated: November 7, 2016 15:06 IST2016-11-07T14:42:07+5:302016-11-07T15:06:02+5:30
ऑनलाइन लोकमत ठाणे, दि. 7 - घोडबंदर रोडवरील नगला बंदर येथे बोरिवली-नेपाळ ही खासगी बस उलटल्याने अपघात झाला. या ...

VIDEO : ठाण्यात खासगी बस उलटून 16 प्रवासी जखमी
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 7 - घोडबंदर रोडवरील नगला बंदर येथे बोरिवली-नेपाळ ही खासगी बस उलटल्याने अपघात झाला. या अपघातात 16 प्रवासी जखमी झाले आहेत. UP 31 T 7557 हा बस क्रमांक आहे.
जखमींपैकी सात जणांना वेदांत हॉस्पिटलमध्ये तर उर्वरित 9 जणांना सिटीझन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक दाखल झाले. दरम्यान, अपघातामागील नेमके कारण अजूनही अस्पष्ट आहे. दरम्यान, अपघातामुळे परिसरात काही वेळासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
{{{{dailymotion_video_id####x844h92}}}}
फोटो - विशाल हळदे