व्हिडीयो - हार्बरवर धावली 12 डब्यांची लोकल

By Admin | Updated: April 29, 2016 16:54 IST2016-04-29T16:51:01+5:302016-04-29T16:54:53+5:30

बहुचर्चित 12 डब्यांची लोकल अखेर आज शुक्रवारी हार्बर रेल्वेच्या प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू झाली आहे

Video - 12 coaches local running on harbor | व्हिडीयो - हार्बरवर धावली 12 डब्यांची लोकल

व्हिडीयो - हार्बरवर धावली 12 डब्यांची लोकल

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - बहुचर्चित 12 डब्यांची लोकल अखेर आज शुक्रवारी हार्बर रेल्वेच्या प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू झाली आहे. दररोज लोकल मधील वाढणारी गर्दी आणि होणारे अपघात यामुळे रेल्वे प्रशासनाने हार्बर रेल्वेवर लोकलच्या डब्ब्यांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. दोन वर्षापासून चालू असणारे काम पुर्ण झाले आणि अखेर आज 12 डब्यांची गाडी हार्बरवर धावली. 
हार्बर मार्गावर १२ डबा लोकल चालविण्यासाठी फलाटांची लांबी वाढवण्यात आली आहे.
 
 
(छायाचित्रे व व्हिडीयो - सुशील कदम)
सध्या हार्बरवर नऊ डब्यांच्या ३६ लोकल धावत असून त्यांच्या रोज एकूण ५९0 फेऱ्या होतात. ३६ लोकलला प्रत्येकी तीन डबे जोडल्यास प्रवासी क्षमता ३३ टक्क्यांनी वाढणार आहे, ज्यामुळे थेट प्रवासी वाहतूक मर्यादा 33 टक्क्यांनी वाढल्यासारखी आहे.

Web Title: Video - 12 coaches local running on harbor