VIDEO : अकोल्यात दस-याला होते रावणाची मुर्तीपूजा
By Admin | Updated: October 10, 2016 13:39 IST2016-10-10T13:29:13+5:302016-10-10T13:39:30+5:30
अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील संगोळा येथे दस-याला रावणाची पूजा अर्चा मोठ्या उत्साहात केली जाते .

VIDEO : अकोल्यात दस-याला होते रावणाची मुर्तीपूजा
राहुल सोनोने, ऑनलाइन लोकमत
वाड़ेगाव (जि.अकोला), दि. १० - अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील संगोळा येथे दस-याला रावणाची पूजा अर्चा मोठ्या उत्साहात केली जाते . संगोळा या गावला रावणाचा इतिहास लाभला असल्याचे बोलले जाते. या परिसरातील जंगलात दहापर्ण असलेले एक झाड होते. त्या झाडाचे पान तोडले असता त्यामधून रक्तासारखा द्रव बाहेर पडला. त्यामुळे सर्व घाबरले या वृक्षा जवळ ऋषिमुनिचे वास्तव्य होते. त्यामधील एका ऋषीने 10 तोंड असलेली मूर्ती शिर्ला येथिल मूर्तिकरला बनवायला सांगितली होती. ती मूर्ती वृक्षाच्या ठिकाणी नेत असतांना आणली या गावातून बैलगाडी समोर जात नव्हती. पुन्हा ४ बैलल लाउन गाड़ी ओढण्याचा प्रयत्न केल्यावर सुद्धा गा[r पुढे जाइना. त्यामुळे गावातील सर्व लोकांनी ती गाडीतून मूर्ती काढून ती मूर्ती गावा जवळ स्थापन केली अशी अख्यायिका आहे. 150 वर्षापेक्षा जास्त कालावधी पासुन येथे दसऱ्याला उत्सव भरतो व रावणाची पूजा केली जाते.