वैदर्भीयांना वेगळे राज्य हवे - हुसेन

By Admin | Updated: May 31, 2015 02:01 IST2015-05-31T02:01:26+5:302015-05-31T02:01:26+5:30

विदर्भातील जनतेला वेगळे राज्य हवे आहे, असे मत भाजपाचे प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. या भावनेचा विचार पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसून करतील, असे ते म्हणाले.

Vidarbiyans need different states - Hussein | वैदर्भीयांना वेगळे राज्य हवे - हुसेन

वैदर्भीयांना वेगळे राज्य हवे - हुसेन

मुंबई : विदर्भातील जनतेला वेगळे राज्य हवे आहे, असे मत भाजपाचे प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. या भावनेचा विचार पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसून करतील, असे ते म्हणाले.
भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भ राज्याबाबत वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत. याकडे लक्ष वेधले असता हुसेन म्हणाले की, लहान राज्यांच्या निर्मितीची भूमिका भाजपाने सुरुवातीपासूनच घेतली आहे. गडकरी हे विदर्भातील नेते आहेत. लहान राज्यांविषयी आमच्या पक्षात मतभिन्नता नाही. जनता परिवाराच्या नावाखाली काही पक्षांनी एकत्र
येऊन बांधलेली मोट टिकणार नाही आणि त्यांचा घटस्फोट अटळ असल्याचे भाकीतही भाजपाचे
राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी वर्तविले.
भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी दावा केला की, राष्ट्रीय जनता दल
आणि समाजवादी पार्टी, धर्मनिरपेक्ष जनता दल असे कितीही एकत्र आले तरी बिहारच्या निवडणुकीत ते भाजपाचा विजय रोखू शकणार नाहीत. (विशेष प्रतिनिधी)े

Web Title: Vidarbiyans need different states - Hussein

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.