शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाच्या सुपुत्राने सभात्याग केला तर नातवाने न्याय दिला, प्रणिती शिंदेचा फडणवीसांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 21:56 IST

मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कर्जमाफी आणि सात बारा कोरा करण्याचा शब्द फिरवल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभात्याग केला होता.

नागपूर -  विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करत राज्यातील शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कर्जमाफी आणि सात बारा कोरा करण्याचा शब्द फिरवल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभात्याग केला होता. या सभात्यागावरून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. अधिवेशनात विदर्भाच्या सुपुत्राने सभात्याग केला तर नातवाने न्याय मिळवून दिला, असे वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी समारोपाचे भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली आजी ही विदर्भातील असल्याचे सांगत आपले विदर्भाशी धट्ट नाते असल्याचे सांगितले होते. तोच धागा पकडून प्रणिती शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाल्यावर विदर्भाच्या सुपुत्राने सभात्याग केला. तर नातवाने न्याय मिळवून दिला, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.  ''नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येईल. कर्जमाफीच्या प्रकियेची सुरुवात ही मार्च महिन्यांपासून होईल. तसेच कर्जमाफीचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातील. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी येत्या १५ दिवसांत योजना जाहीर केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सभागृहात केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कर्जमाफीवरून सरकारला धारेवर धरले. सरकटक कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या घोषणेचे काय झाले असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातून सभात्याग केला होता.    

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस