विदर्भाची संत्री श्रीलंकेला रवाना
By Admin | Updated: November 11, 2015 02:46 IST2015-11-11T02:46:21+5:302015-11-11T02:46:21+5:30
महाआॅरेंज कृषी पणन महामंडळ आणि खासगी निर्यातदारांच्या संयुक्त प्रयत्नाने विदर्भातील संत्री प्रथमच श्रीलंका येथे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर निर्यात करण्यात आली
_ns.jpg)
विदर्भाची संत्री श्रीलंकेला रवाना
कारंजा (घा.) (वर्धा) : महाआॅरेंज कृषी पणन महामंडळ आणि खासगी निर्यातदारांच्या संयुक्त प्रयत्नाने विदर्भातील संत्री प्रथमच श्रीलंका येथे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर निर्यात करण्यात आली. सोमवारी प्री-कूलिंग व्यवस्था असलेल्या कंटनेरला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या निर्यात सुविधा केंद्रातून निर्यात सुरू झाल्याने हे केंद्र सार्थकी लागले आहे. काँग्रेस शासनाच्या कार्यकाळात संत्री बागायतदारांना संत्री विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे निर्यात सुविधा केंद्र सुरू झाले होते. (प्रतिनिधी)