विदर्भातील संत्र्यावर होणार नव्याने संशोधन !

By Admin | Updated: July 1, 2015 01:43 IST2015-07-01T01:43:36+5:302015-07-01T01:43:36+5:30

आरकेव्हीवायला पाठविला २३.५0 कोटीचा प्रस्ताव.

Vidarbha will be the new research on the orange! | विदर्भातील संत्र्यावर होणार नव्याने संशोधन !

विदर्भातील संत्र्यावर होणार नव्याने संशोधन !

अकोला: विदर्भातील नागपुरी संत्र्याला स्वतंत्र ओळख मिळाल्यांनतर या संत्र्याच्या उत्पादन वाढीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले असून, या पिकावर संशोधन करण्यासाठी मंगळवारी राष्ट्रीय कृषी विकास योजनेकडे (आरकेव्हीवाय) साडेतेवीस कोटीचा प्रस्ताव पाठविला आहे. राज्यात जवळपास १ लाख ५0 हजार हेक्टर क्षेत्रावर संत्र्याचा पेरा आहे; परंतु या संत्र्याचे उत्पादन हेक्टरी ३ ते १0 टन एवढेच र्मयादित आहे. १0 टन उत्पादन घेणारे शेतकरी फारच कमी आहेत. देश-विदेशात मागणी असलेल्या या संत्र्याचे उत्पादन वाढल्यास विदर्भातील शेतकर्‍यांना ते दिलासादायक ठरणारे असल्याने, उत्पादन वाढीवर कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले आहे. या अगोदर इंडो-इस्त्रायल या नावाने संत्रा प्रकल्प राबविण्यात येत आहे. आता या संत्र्यावर नवीन संशोधन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी प्रादेशिक संत्रा फळ संशोधन केंद्र येथे अद्ययावत प्रयोगशाळा बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पासोबतच कृषी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागांतर्गत संत्र्यावर स्वतंत्र संशोधन सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत भेसळयुक्त रोपांचा शोध घेतला जाणार आहे. संत्रा रोपे असलेली नर्सरी विकसित करण्यात येत आहे. शेतकर्‍यांना दज्रेदार संत्र्याची रोपे मिळावीत याकरिता या नर्सरीमधून विषाणू व रोगमुक्त सक्षम संत्रा रोपे तयार करण्यात येणार आहेत. यासाठी उतीसंवर्धन व संत्र्यासाठी लागणारे विविध संशोधन या नर्सरीत व प्रयोगशाळेत करण्यात येत आहे. संत्रा पिकावर संशोधन करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याने सुरुवातीला १४ कोटीचा प्रस्ताव आरकेव्हीवाय योजनेंतर्गत राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता; तथापि संशोधनाचे काम मोठे असल्याने कृषी विद्यापीठात २३.५0 कोटी रुपयांचा फेर प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो ३0 जून रोजी प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला.

Web Title: Vidarbha will be the new research on the orange!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.