विदर्भ राज्यास विरोध नाही
By Admin | Updated: May 27, 2015 01:53 IST2015-05-27T01:53:16+5:302015-05-27T01:53:16+5:30
छोट्या राज्यांच्या निर्मितीचे भाजपाने नेहमीच समर्थन केले आहे. विदर्भ राज्याच्या निर्मितीला आमचा विरोध नाही, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज सांगितले.

विदर्भ राज्यास विरोध नाही
मुंबई : छोट्या राज्यांच्या निर्मितीचे भाजपाने नेहमीच समर्थन केले आहे. विदर्भ राज्याच्या निर्मितीला आमचा विरोध नाही, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज सांगितले.
नरेंद्र मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. तीन छोटी राज्ये भाजपाच्याच सत्ताकाळात शांततेत झाली होती.
काँग्रेसच्या काळात तेलंगणा राज्य होताना रक्तपात झाला, असे सांगून दानवे म्हणाले की, राजकारणासाठी आम्हाला विदर्भाचा मुद्दा वापरायचा नाही. राज्याच्या व्यापक हिताचा प्रसंग समोर येईल तेव्हा विदर्भाचा मुद्दा योग्य रीतीने पक्ष हाताळेल.
मोदी सरकारच्या उपलब्धी या चमत्काराच्याही पलीकडच्या आहेत, अशी प्रशंसा करून दानवे यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना घराघरांत पोहोचविण्याचा संदेश प्रदेश भाजपाच्या कोल्हापूरमधील बैठकीने नेते आणि कार्यकर्त्यांना दिला.