काटोलमध्ये 'विदर्भ माझा'चा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2017 13:24 IST2017-01-09T13:17:33+5:302017-01-09T13:24:45+5:30
काटोल पालिकेत 10 जागांवर विदर्भ माझा पक्षाने विजय मिळवला आहे. तर चार जागांवर शेकापचे उमेदवार विजयी झाले आहेत.

काटोलमध्ये 'विदर्भ माझा'चा झेंडा
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 9 - वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी निवडणूकित उतरलेल्या अणेंच्या विदर्भ माझा पक्षाने दणक्यात सुरुवात केली आहे. काटोल पालिकेत 10 जागांवर विदर्भ माझा पक्षाने विजय मिळवला आहे. तर चार जागांवर शेकापचे उमेदवार विजयी झाले आहेत. अध्यक्षपदासाठी विदर्भ माझाच्या वैशाली ठाकूर आघाडीवर आहेत. भाजपा आणि शिवसेनासह इतर कोणत्याच पक्षाला अद्याप खातं उघडता आलं नाही. 9 जागांवर अद्याप मतमोजणी सुर आहे. तीन वाजेपर्यंत निवडणूकिचे चित्र समोर येईल.
काटोल येथे काल एकूण ७०.७४ टक्के मतदान झाले. येथे एकूण ३१,८२४ मतदार असून, ४४ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. येथे नगराध्यक्ष पदासाठी ९ आणि नगरसेवकांच्या २३ जगांसाठी ११५ उमेदवार भाग्य आजमावत आहेत.