विदर्भ तापलेलाच!
By Admin | Updated: May 21, 2015 08:31 IST2015-05-21T02:45:15+5:302015-05-21T08:31:34+5:30
बुधवारीदेखील विदर्भातील बहुतांश ठिकाणी तापमान ४५ अंशाच्या वरच होते. चंद्रपूर येथे सर्वाधिक ४७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले,

विदर्भ तापलेलाच!
चंद्रपूर ४७.४ अंश : बहुतांश ठिकाणी ४५ अंशावर तापमान
नागपूर : उपराजधानी नागपूरसह संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. बुधवारीदेखील विदर्भातील बहुतांश ठिकाणी तापमान ४५ अंशाच्या वरच होते. चंद्रपूर येथे सर्वाधिक ४७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले, तर वर्धा व नागपूर येथे अनुक्रमे ४७.२ व ४७ अंश सेल्सिअस तापमान होते. ‘मे हीट’चा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच विदर्भातील तापमानात वाढ दिसून येत आहे. संपूर्ण विदर्भच कडक उन्हामध्ये होरपळून गेला. सकाळपासूनच उष्मा जाणवत होता. शहर तसेच ग्रामीण भागांमध्ये वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हवालदिल झाले. अनेक ठिकाणी तर दुपारच्या सुमारास अघोषित संचारबंदीच जाणवत होती. आणखी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहील व तापमान वाढू शकेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे.