विदर्भातील शेतकऱ्यांनी घेतली सेंद्रिय शेतीची माहिती!

By Admin | Updated: October 20, 2016 05:08 IST2016-10-20T05:08:29+5:302016-10-20T05:08:29+5:30

मानवी आरोग्याला घातक असलेली रसायने कमी करू न, सेंद्रिय शेतीचा प्रसार अलीकडे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून करण्यात येत आहे.

Vidarbha farmers take organic farming information! | विदर्भातील शेतकऱ्यांनी घेतली सेंद्रिय शेतीची माहिती!

विदर्भातील शेतकऱ्यांनी घेतली सेंद्रिय शेतीची माहिती!


अकोला : मानवी आरोग्याला घातक असलेली रसायने कमी करू न, सेंद्रिय शेतीचा प्रसार अलीकडे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून करण्यात येत आहे. यासाठी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरच सेंद्रिय शेतीचे मॉडेल तयार करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती तंत्रज्ञान अवगत करण्यावर शिवार फेरीच्या दुसऱ्या दिवशी भर देण्यात आला.
अकोल्यात कृषी विद्यापीठ स्थापना दिनाचे औचित्य साधून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अकोल्यात शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून नवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेतली. वाशिम, अमरावती, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी शिवार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शासनाने सेंद्रिय शेती विकासासाठी आर्थिक तरतूद केली असून, कृषी विद्यापीठांना निधी उपलब्ध केला आहे. कृषी विद्यापीठाने या वर्षी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची माहिती देण्यासाठी खास शास्त्रज्ञांची निवड केली आहे. शिवार फेरीत कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक आर. व्ही. गमे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: Vidarbha farmers take organic farming information!