हेडफोनने घेतला तरुणीचा बळी

By Admin | Updated: August 10, 2015 01:02 IST2015-08-10T01:02:19+5:302015-08-10T01:02:19+5:30

कानाला हेडफोन लावून रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करीत असताना मालगाडीची धडक बसल्याने सांगलीतील डॉक्टर तरुणीचा जागीच मृत्यू झाला

The victim was the victim of headphones | हेडफोनने घेतला तरुणीचा बळी

हेडफोनने घेतला तरुणीचा बळी

सांगली : कानाला हेडफोन लावून रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करीत असताना मालगाडीची धडक बसल्याने सांगलीतील डॉक्टर तरुणीचा जागीच मृत्यू झाला. विश्रामबाग रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी ही घटना घडली.
नीता पंडित गायकवाड (३४) असे तिचे नाव असून ती दंतचिकित्सक होती. नीता दररोज सकाळी विलिंग्डन महाविद्यालयाच्या मैदानावर फिरायला जायची. सकाळी साडेआठच्या सुमारास ती घरी परतताना नीता यांच्या हातात मोबाइल व कानाला हेडफोन होता. विश्रामबाग रेल्वे स्थानकातून रूळ ओलांडताना मिरजेहून पुण्याला निघालेल्या मालगाडीने धडक दिली. त्या रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात असल्याचे रेल्वेचालकाने पाहिले होते. त्यामुळे त्याने हॉर्न वाजविला; पण नीता यांना हेडफोनमुळे ऐकू आले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: The victim was the victim of headphones