खड्ड्याने घेतला तरुणीचा बळी

By Admin | Updated: July 6, 2017 04:33 IST2017-07-06T04:33:22+5:302017-07-06T04:33:22+5:30

खारेगाव टोल नाका ते वडपा या रस्त्यावर दुचाकी खड्ड्यात जाऊन झालेल्या अपघातात एकीचा मृत्यू झाला. उल्हासनगरहून रश्मी रोहेरा, करुणा

The victim is the victim of the quart | खड्ड्याने घेतला तरुणीचा बळी

खड्ड्याने घेतला तरुणीचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : खारेगाव टोल नाका ते वडपा या रस्त्यावर दुचाकी खड्ड्यात जाऊन झालेल्या अपघातात एकीचा मृत्यू झाला. उल्हासनगरहून रश्मी रोहेरा, करुणा व सोनी भटिजा या तिघी ठाण्याला बुधवारी सकाळी दुचाकीवरून नोकरीसाठी जात होत्या. मुंबई-नाशिक महामार्गावरील हायवे-दिवा येथे त्यांच्या दुचाकीला गाडीने ओव्हरटेक केले. तेव्हा बचाव करताना त्यांची दुचाकी खड्ड्यात जाऊन तिघी रस्त्यावर पडल्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली जाऊन रश्मीचा मृत्यू झाला. या अपघातात सोनी भटिजा गंभीर जखमी असून, करुणा भटिजा किरकोळ जखमी झाली आहे. या दोघींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: The victim is the victim of the quart