दगडाने घेतला ट्रेकरचा बळी

By Admin | Updated: June 27, 2016 05:05 IST2016-06-27T05:05:04+5:302016-06-27T05:05:04+5:30

पायऱ्यांनी किल्ले रायगड उतरत असताना गडावरून कोसळलेला एक दगड ट्रेकरच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

The victim took the stone to the Trekker's victim | दगडाने घेतला ट्रेकरचा बळी

दगडाने घेतला ट्रेकरचा बळी


महाड : पायऱ्यांनी किल्ले रायगड उतरत असताना गडावरून कोसळलेला एक दगड ट्रेकरच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याचा सुमारास ही घटना घडली.
अजयप्रतापसिंह प्रदीपसिंह सिकरवार (२८, मूळ रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश, सध्या रा. पिंपळे सौदागर, पुणे) असे मृत तरु णाचे नाव असून, तो पुण्यात एका आयटी व्यवस्थापनात इंजिनीअर म्हणून सेवेत होता. अजयप्रतापसिंह हा आपल्या १६ सहकाऱ्यांसमवेत शनिवारी पहाटे किल्ले रायगड ट्रेकिंगसाठी आला होता. ट्रेकिंग पूर्ण झाल्यानंतर गड उतरत असताना रात्री साडेआठ वाजण्याच्या कड्यावरून सुटलेला एक दगड थेट अजयप्रतापसिंहच्या पाठीवर आदळून त्यालागंभीर दुखापत झाली. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला प्रथम पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी त्याला महाड ग्रामीण रु ग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा सहकारी प्रशांतकुमार मिश्रा याने या घटनेची माहिती महाड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी अधिक तपास प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक एन.पी. पाटील हे करीत आहेत. रविवारी त्याचे पार्थिव त्याच्या बहिणीच्या ताब्यात देण्यात आले. (वार्ताहर)
>डोंबिवलीतील ट्रेकरचाही मृत्यू : पेब किल्ल्याजवळील घटना
कल्याण : भिवपुरी येथे मित्रांसोबत ट्रेकिंगला गेलेल्या हर्षद भोळे या डोंबिवलीकर विद्यार्थ्याच्या डोक्यावर दगड पडल्याने शनिवारी दुर्दैवी मृत्यू झाला. हर्षद हा डोंबिवली पश्चिमेकडील कान्हा सदन येथे आईवडील आणि मोठा भाऊ प्रणय यांच्यासमवेत राहायचा. त्याच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुलुंड येथील एका महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकणारा हर्षद शनिवारी मोठा भाऊ प्रणय आणि त्याच्या चार मित्रांसोबत भिवपुरी-माथेरानला जोडणाऱ्या पेब किल्ला येथे ट्रेकिंगला गेला होता. या वेळी अचानक तेथील एक मोठा दगड त्याच्या अंगावर घरंगळत आला. यात त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. त्याला वाचवताना भाऊ प्रणय आणि अन्य एक मित्रदेखील जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या हर्षदला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने नेरळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुपारी अडीचच्या सुमारास त्याच्या पालकांना या घटनेची माहिती देण्यात आली. रात्री उशिरा हर्षदचा मृतदेह डोंबिवलीत आणल्यानंतर शिव मंदिर मोक्षधाम स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
>भारतीय पुरातत्त्व विभागाची निष्क्रि यता
किल्ले रायगड भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत गडाच्या कड्यांवरून छोटे-मोठे दगड सुटून पायऱ्यांवर कोसळण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. मात्र पुरातत्त्व विभागाने यावर प्रतिबंधक उपाय करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. दगड अंगावर पडून पर्यटकाचा मृत्यू होण्याची ही वर्षभरातील दुसरी घटना आहे. किमान यानंतर तरी अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी पुरातत्त्व विभागाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.
>भारतीय पुरातत्त्व विभागाची निष्क्रि यता
किल्ले रायगड भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत गडाच्या कड्यांवरून छोटे-मोठे दगड सुटून पायऱ्यांवर कोसळण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. मात्र पुरातत्त्व विभागाने यावर प्रतिबंधक उपाय करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. दगड अंगावर पडून पर्यटकाचा मृत्यू होण्याची ही वर्षभरातील दुसरी घटना आहे. किमान यानंतर तरी अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी पुरातत्त्व विभागाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.

Web Title: The victim took the stone to the Trekker's victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.