विक्रोळीत विद्यार्थ्याची आत्महत्या
By Admin | Updated: April 7, 2016 02:41 IST2016-04-07T02:41:04+5:302016-04-07T02:41:04+5:30
अभ्यासाच्या तणावातून आठवीतील विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. खालीद शाहिद खान असे त्याचे नाव असून या प्रकरणी पार्कसाइट पोलीस अधिक तपास करत आहेत.

विक्रोळीत विद्यार्थ्याची आत्महत्या
मुंबई : अभ्यासाच्या तणावातून आठवीतील विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. खालीद शाहिद खान असे त्याचे नाव असून या प्रकरणी पार्कसाइट पोलीस अधिक तपास करत आहेत.
विक्रोळी पार्कसाइट परिसरात खान हा कुटुंबीयांसोबत राहायचा. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आंघोळीला जातो, असे सांगून तो बाथरूममध्ये गेला. तेथे जाऊन त्याने टॉवेलच्या साहाय्याने शॉवरला गळफास घेत आत्महत्या केली. बराच वेळ उलटूनही खान बाहेर येत नसल्याने आईने दरवाजा उघडला. तेव्हा खान गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी विक्रोळी पार्कसाइट पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात अभ्यासाच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी अधिक तपास
सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)