मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंके यांचा राजीनामा

By Admin | Updated: August 9, 2016 18:33 IST2016-08-09T18:22:16+5:302016-08-09T18:33:18+5:30

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Vice Chancellor of the Open University Dr. Manikrao Salunkhe resigns | मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंके यांचा राजीनामा

मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंके यांचा राजीनामा

>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 09 -  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 
गेल्या काही दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यास शासनाने विरोध केल्यामुळे डॉ. माणिकराव साळुंके यांचे शासनाशी मदभेद झाले होते. त्यानंतर आज  त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचाच राजीनामा दिला आहे.  
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे १४ वे कुलगुरू म्हणून प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांची निवड करण्यात आली होती. 

Web Title: Vice Chancellor of the Open University Dr. Manikrao Salunkhe resigns