व्ही.जी. पाटील खुनाबद्दल जन्मठेप
By Admin | Updated: November 16, 2014 01:45 IST2014-11-16T01:45:18+5:302014-11-16T01:45:18+5:30
काँग्रेसचे तत्कालीन जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही.जी. पाटील खून प्रकरणातील मुख्य आरोपी राजू सोनवणो याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.जे. शेगोकार यांनी शनिवारी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली.

व्ही.जी. पाटील खुनाबद्दल जन्मठेप
जळगाव : काँग्रेसचे तत्कालीन जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही.जी. पाटील खून प्रकरणातील मुख्य आरोपी राजू सोनवणो याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.जे. शेगोकार यांनी शनिवारी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. सीबीआयने राजू सोनवणोला केलेल्या फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती; परंतु त्यांची ही मागणी न्यायालयाने फेटाळली.
या प्रकरणातील इतर दोन आरोपी दामोदर लोखंडे व लीलाधर नारखेडे यांच्याविरुद्धही खटला चालविण्यात येणार असून, न्यायालयाने त्यांना 8 डिसेंबर रोजी हजर होण्याचे आदेश दिले.
प्रा. व्ही.जी. पाटील यांचा 21 सप्टेंबर 2क्क्5 रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास जळगावातील मानराज पार्कजवळील नेत्रदीप अपार्टमेंटजवळ दोघा अज्ञात हेल्मेटधारी हल्लेखोरांनी धारदार शस्त्रंनी वार करून खून केला होता.
या प्रकरणी न्या. डी.जे. शेगोकार यांनी शुक्रवारी आरोपी राजू चिंतामण सोनवणो (वय-3क्, रा. बहादरपूर, जि. ब:हाणपूर) याच्याविरुद्ध आरोप सिद्ध झाल्याचे जाहीर केले
होते. त्याला फाशी द्यावी की
जन्मठेप यावर शनिवारी दुपारी युक्तिवाद झाला. सीबीआयचे
वकील डी.एन. साळवी यांनी राजू सोनवणो याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती. तर आरोपीचे वकील एस.के.कौल यांनी आरोपीचे वय, त्याच्यावर अवलंबून असणा:या कुटुंबीयांचा विचार करून कमीतकमी शिक्षा देण्याची विनंती केली होती.
असे आहे शिक्षेचे स्वरूप
शनिवारी संध्याकाळी 5 वाजता न्या. शेगोकार यांनी आरोपी राजू सोनवणो याला कलम 3क्2 प्रमाणो जन्मठेप व 5 हजार रुपये दंडाची तर कलम 12क् ब प्रमाणो 1क् वर्ष सश्रम कारावास व 2 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास दीड वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी हा 9 वर्षे 45 दिवस कारागृहात होता तितक्या दिवसांची त्याला सूट मिळेल. दोन्ही शिक्षा त्याला एकाच वेळी भोगाव्या लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
दोघांविरुद्ध 8 डिसेंबरपासून कामकाज
या खटल्यातील इतर आरोपी दामोदर लोखंडे व लीलाधर नारखेडे या दोघांविरुद्ध 8 डिसेंबरपासून खटला चालविण्यात येणार असून, त्यांनी तारखेला हजर राहावे असे आदेश दिले. तर डॉ. उल्हास पाटील व डॉ. जी.एन. पाटील यांना आरोपी करण्याबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वीच स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या दोघांबाबत निर्णय घेण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.