किशोरीताई आमोणकरांना दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

By Admin | Updated: April 4, 2017 11:37 IST2017-04-04T11:09:05+5:302017-04-04T11:37:50+5:30

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका ‘गानसरस्वती’ किशोरीताई आमोणकर यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. किशोरीताईंना सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींपासून अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली.

Veteran tributes to teenager Amonkar | किशोरीताई आमोणकरांना दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

किशोरीताई आमोणकरांना दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 4 - ज्येष्ठ शास्त्रीय गायिका ‘गानसरस्वती’ किशोरीताई आमोणकर यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. किशोरी आमोणकर यांच्यावर आज सायंकाळी चार वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.  
 
दरम्यान, किशोरीताई आमोणकर यांना दिग्गजांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किशोरीताईंना श्रद्धांजली देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 
किशोरीताईंच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘किशोरीताई आमोणकर यांच्या निधनाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील विशुद्ध सूर हरपला. किशोरीताईंच्या सुरांचा मी स्वतः एक निःसीम चाहता, त्यामुळे किशोरीताईंच्या जाण्याने संगीत रसिकांना झालेल्या दुःखाची व भारतीय शास्त्रीय संगीतक्षेत्रात निर्माण झालेल्या पोकळीची कल्पना येऊ शकते.’ अशा शब्दात पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  
 

Web Title: Veteran tributes to teenager Amonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.