शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

लोककलावंत कांताबाई सातारकरांपाठोपाठ कन्या अनिता आणि नातवाचंही कोरोनानं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 12:52 IST

मराठी तमाशाविश्वातील वगसम्राज्ञी अशी ओळख असलेल्या कांताबाई सातारकर यांचं काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये कोरोनानं निधन झालं होतं. आता त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या थोरल्या कन्या अनिता आणि नातू अभिजीत यांचंही कोरोनानं निधन झालं आहे.

मराठी तमाशाविश्वातील वगसम्राज्ञी अशी ओळख असलेल्या कांताबाई सातारकर यांचं काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये कोरोनानं निधन झालं होतं. आता त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या थोरल्या कन्या अनिता आणि नातू अभिजीत यांचंही कोरोनानं निधन झालं आहे. अवघ्या आठ दिवसांत एकाच कुटुंबातील तीन जणांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. 

ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर या तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री होत्या. काही दिवसांपूर्वी खेडकर कुटुंबीयांना कोरोनाची लागण झालेली होती. कुटुंबातील जवळपास ८ सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. अशातच कुटुंबातील अनेकजण कोरोनामुक्त होऊन घरी परतले होते. परंतु, अवघ्या आठ दिवसांत खेडकर कुटुंबियांनी तीन जणांना गमावलं आहे.

२५ मे रोजी ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचं कोरोनानं निधन झालं होतं. त्यापाठोपाठ त्यांच्या थोरल्या कन्या आणि नातवाचं कोरोनामुळं निधन झालं आहे. तमाशाच्या गौरवशाली परंपरेतील संघर्षाबरोबरच सुवर्णकाळ अनुभवलेल्या कांताबाईंच्या जाण्याने कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यातच एकाच कुटुंबातील तीन सदस्य गमावल्यानं खेडकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

कोण होत्या कांताबाई सातारकर?गुजरातमधील बडोदा जिल्ह्यातील टिंबा या गावात १९३९ मध्ये कांताबाई यांचा जन्म झाला. त्यांना तमाशाचा कोणताही वारसा नव्हता. पुढे त्यांचे आई-वडील सातारा या मूळगावी आले. तेथे कांताबाई यांना ‘नवझंकार मेळ्यात’ नृत्याची संधी मिळाली आणि त्यांचा कलाप्रवास सुरू झाला. मुंबईत तमाशामहर्षी तुकाराम खेडकर यांच्या तमाशात काम करताना त्यांच्यातील कलाकार घडत गेला. खेडकर आणि कांताबाई या जोडीला अमाप लोकप्रियता मिळाली. पुढे खऱ्या आयुष्यातही ही जोडी एक झाली. पती खेडकर यांच्या निधनानंतर कांताबाईंनी स्वतःचा फड उभा केला.  

पुरुषी भूमिकाही हुबेहूब वठविल्यामराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका केल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, स्त्रीने पुरुषी भूमिका केल्याची उदाहरणे क्वचितच पाहायला मिळतील. कांताबाईंनी वगनाट्यांतून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका इतक्या हुबेहूब वठवल्या की, पुरुष कलाकारांनाही त्या भूमिकांची नक्कल करावी वाटायचे, असा त्यांचा लौकिक होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस